बारामती ता.०६-: सुनील निंबाळकर ,बारामती प्रतिनिधी :–बहुजन हक्क परिषद,महाराष्ट्र राज्य,शाखा वडगांव निंबाळकर (बंगला) उद्घघाटन सोहळा उद्या दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता आयोजित केला आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान या कार्यक्रमाचे निमंत्रक पैलवान नानासाहेब मदने युवक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.बहुजन हक्क परिषद,महाराष्ट्र राज्य,शाखा वडगांव निंबाळकर (बंगला) उद्घघाटन सोहळा शिवाजीराजे राजे निंबाळकर मा.महसुल आयुक्त पुणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल तात्या धिवार संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य हे आहेत.या कार्यक्रमाचे निमंत्रक पैलवान नानासाहेब मदने,युवक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद म.राज्य,अमोल गायकवाड,युवक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद बारामती तालुका,अनिल कदम अध्यक्ष बहुजन हक्क परिषद बारामती तालुका,तसेच आयोजक शाखेचे सर्व पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते,महिला वर्ग,युवक वर्ग, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आहेत.कार्यक्रमाची वेळ व दिनांक रविवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी ठीक ५:०० वाजता होणार आहे.कार्यक्रमाचे स्थळ वडगांव निंबाळकर (बंगला) ता.बारामती जि.पुणे हे आहे.






















