महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
दादासाहेब मोकाशी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिना अल्ताफ शेख हिची देशपातळीवर. २०१९-२०मध्ये झालेल्या बँकिंगच्या परीक्षेमधून कॅनरा बँक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शेतीक्षेत्र अधिकारी पदी निवड झाली.

हिना शेख हिने बी. टेक. (अन्न तंत्रज्ञान) पदवी घेताना परीक्षेची तयारी सुरू केली. नम्र, चिकिस्तक व हुशारीने यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबातील सदस्य, शिक्षक तसेच मित्र-मैत्रिणींना दिले. आई-वडिलांचा आनंद माझ्यासाठी सर्वोत्तम होता, अशी भावना तिने व्यक्त केली. हिना शेतीचे मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉक्टर विश्वजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी, प्राचार्य ए एस ढाणे, शिक्षकांनी अभिनंदन केले.






















