लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच, पुरुषोत्तम जाधव यांची माहिती
सातारा प्रतिनिधी
दि. २४
आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार हा महायुतीचाच होणार असून सातारा लोकसभेची जागा ही युतीच्या धर्माप्रमाणे शिवसेनेचीच आहे महायुतीमध्ये चर्चेनसार वरिष्ठांच्या आदेशानुसार जो उमेदवार देण्यात येईल त्याला निश्चितच निवडून आणले जाईल. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) पुरूषोत्तम जाधव पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याला आजपर्यंत आमदार किंवा खासदार या नात्याने कधीच प्रतिनिधित्व मिळाले नाही अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली. साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पुरूषोत्तम जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले, राज्यात आंदोलन उपोषण चालू आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातही चालू आहे. लोणंद येथे धनगर आरक्षण साठी उपोषण तर शिरवळ येथे ही न्याय हक्कासाठी उपोषण चालू आहेत.आता लोणंदच्या विषयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना घेऊन गेलो होतो उपोषण स्थगित करण्यास सांगितले पण ते त्यांनी थांबवले नाही, माझी उपोषण कर्त्यांना एकच विनंती की यामध्ये कोणाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांसाठी काम करत आहेत. मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी आंदोलन करत आहेत एकूणच ही सर्व आंदोलने शांततेत झाली पाहिजेत आम्ही सत्ताधारी असलो तरी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होईपर्यंत त्यांच्याबरोबर काम करणार आहे. २०१० पासून शिवसेनेचे काम करत आहे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी पक्षाचे काम करताना निधी दिला नाही पण तरीही काम केले आहे.
ग्रामीण भागासाठी निधीच्या बाबतीत शासन कमी पडत नाही मूलभूत सोई सुविधांसाठी शासन त्या कामाचा निपटारा करत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आज काही ठिकाणी स्मशान भूमी सह मूलभूत गरजा आज ही जाणवत आहेत त्यावर काम झालं पाहिजे
आजपर्यंत खंडाळा येथे स्थानिक लोकप्रतिनिधी मिळाला नसल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत
विजेचा प्रश्न, मांढरदेवी रस्ता एमआयडीसी प्रश्न आजही प्रलंबित आहेत मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली त्यानंतर आता याबाबत निधी टाकायला लावल्यामुळे विजेचा काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागला आहे.
वाईत जल लक्ष्मी योजनेसाठी चार कोटींचा निधी आवश्यकता होती ती बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आता तो ही मार्गी लागत आहे
मांढरदेवी रस्ता झाला तर दळण वळण वाढून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे आतापर्यंत निधी या रस्त्यासाठी का मिळाला नाही याचा गौडबंगाल वेगळंच असेल पण या रस्त्याचं प्रश्न चर्चा करून मार्गी लावला आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून सातारा जिल्ह्याच्या विकास कामांच्या निधीसाठी झुकत माप दिलं आहे. पर्यटनाच्या बाबतीत ही लक्ष घातले आहे. कोयना पर्यटनाला यापूर्वी मान्यता नव्हती पण आज त्याला मान्यता देण्याच काम केल. कास परिसरातील मुनावळे येथे स्कुबा ड्रायव्हिंग सुरू केलं आहे
एसटी स्टँड येथे दवाखाना सुरू करण्याचा मानस आहे. जे की रुग्णांना तात्काळ त्याचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये सरकार हे सामन्यासाठी काम करत आहे. मेडिकल कॉलेज, जिहे कठापूर, भुयारी मार्ग हे विषय ही मार्गी लागत आहेत. लोकसभेला हा मतदार संघ शिवसेनेला मिळणार काय अन तुम्ही इच्छुक आहात काय ? या प्रश्नाच्या संदर्भात बोलताना जाधव म्हणाले, युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेकडेच आहे यापूर्वी हिंदुराव निंबाळकर हे निवडून आले होते.हा मतदार संघ युतीच्या वाटपात सेनेकडे आहे अन आम्हाला हे बळ दिले जात आहे त्यामुळे शिवसेना लढणार आहे वरिष्ठ यांच्या निर्णयानंतर ते जो उमेदवार देतील त्या सेनेच्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार आहे. २००९ मध्ये अपक्ष लढलो त्यामध्ये अडीच लाख मते मिळाली होती. २०१९ मध्ये त्यावेळचे संपर्क प्रमुख बानगुडे पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेत गेलो होतो. तेव्हा लोकसभेला उभे राहिलो.
मी उदयनराजे यांच ही काम केलं आहे त्यामुळे उद्या ही निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी आहे जो उमेदवार देतील तो निवडून दिला जाईल.
काल दिवाळी मध्ये आम्ही जी रचना केली आहे त्यानुसार जिल्ह्यातील बूथ प्रमुखांना शुभेच्छा पोहोचवल्या आहेत.आम्हाला महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे. माझा मकरंद पाटील यांच्यावर रोष नाही, ते आमच्या बरोबर काम करत आहेत. मकरंद पाटील हे युतीत आल्यामुळे माझी कोणतीही अडचण झाली नाही. आमची ताकत चार विधानसभा मतदार संघात आहे. त्यामुळे खात्रीने सांगतो हा मतदार संघ शिवसेनेला आला तर याचा उमेदवार भरघोस मताने निवडून येणार असे पुरुषोत्तम जाधव म्हणाले.