दहिवडी : ता.२६
भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दहिवडी येथे भाजपचे नगरसेवक रुपेश मोरे व दहिवडी आगाराच्यावतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
दहिवडी बसस्थानकात असलेल्या श्री दत्त मंदिरात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या या रक्तदान शिबिरात सकाळी ०८ वाजल्यापासून सुमारे १०० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. बालाजी ब्लड सेंटर सातारचे राम भोसले, सचिन शिंदे यांचे आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरास आमदार जयकुमार गोरे यांनी भेट दिली. यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि दहिवडी आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, वरिष्ठ लिपिक दादासाहेब खाडे, स्थानक प्रमुख प्रवीण पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे यांच्यासह आगाराचे विविध कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महापुरुषांनी सांडलेल्या रक्ताची कृतज्ञता म्हणून हा उपक्रम राबवावा वाटला,असे मत नगरसेवक रुपेश मोरे यांनी व्यक्त केले.