सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला साखर कारखाना म्हणून किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज याची ओळख आहे. हा कारखाना कर्जातून बाहेर काडण्यासाठी व पुन्हा या कारखान्याला गतवैभव लागावे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी कारखाना निवडणूक लढवली. वाई महाबळेश्वर व खंडाळा या तालुक्यात विकास कामे करून मकरंद पाटील हे लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना निवडणूक लढवून ती जिंकून देखील मकरंद पाटील यांनी दाखविली शेतकऱ्यांनी आमदार यांच्यावर ठेवलेला हा विश्वासच होता. आमदार मकरंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आज दिनांक १७/५/२०२२ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा मनोहर माळी यांनी बोलविली होती

त्यामध्ये मकरंद पाटील यांच्या नावावर सर्वांनी होकार दिला तर उपाध्यक्ष पदी प्रमोद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी मकरंद पाटील, प्रमोद शिंदे, शशिकांत पिसाळ, मस्कर भाऊ, जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील, तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांना संचालक मंडळाने दिले होते. तसेच सभासदांनी देखील असे सांगितले होते की या दोघांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य असेल.


















