महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कोव्हिड केअर सेंटरला पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी रविवार, दि. ४ आक्टोंबर २०२० रोजी भेट दिली. यावेळी अंकिता पाटील यांनी तेथील आरोग्य विषयक सेवा सुविधांची पाहणी करत, कोरोना रूग्णांशी संवाद साधला.
कोरोना रूग्णांची आपुलकीने आरोग्य विषयक चौकशी करून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. येणारे काळात कोरोनाशी लढताना वालचंदनगर मधील कोव्हिड केअर सेंटरला काही मदत लागल्यास, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणखी सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना कोव्हिड केअर सेंटरमध्ये कोव्हिड योद्धा म्हणून काम करणारे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन अंकिता पाटील यांनी केले.






















