बारामती प्रतिनिधी / सुनील निंबाळकर : महाराष्ट्र शासन कृषी संजीवनी सप्ताह मोहिमे अंतर्गत मुरूम ( ता.बारामती ) येथे वडगाव निंबाळकर मंडल कृषी पर्यवेक्षक सी. एस. जगताप व श्रीमती पी.एस. मदने कृषी साहाय्यिका यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती बारामती च्या सभापती नीता फरांदे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन पीक या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले बी.एफ. यंत्राने पेरणी करुन उत्पादन कसे वाढवावे त्याबद्दल चे फायदे पटवून देण्यात आले व शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला यांत्रिक शेतीतून काय फायदे होतील याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. जैविक शेतीतून त्याला समृद्धीकडे रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून विषमुक्त शेती कशी करावी तसेच महिलांना बचत गटातून विकेल ते पिकेल याची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमा वेळी सी. एस. जगताप कृषी पर्यवेक्षक, श्रीमती. पी.एस. मदने कृषी सहाय्यिका,एस.एस.सावंत कृषी साहाय्यक,बी.बी. लोणकर कृषी साहाय्यक, ओ.एल.चव्हाण कृषी साहाय्यक हे सर्व अधिकारी मार्गदर्शनास उपस्थित होते तसेच मुरूम गावातील सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.