महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे
खटाव माण अँग्रो साखर कारखान्याचा सन २०२०-२१ या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दि ११ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी २ वाजता कारखान्याचे चेअरमन, मा.आ.प्रभाकर घार्गे व को चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या शुभहस्ते तसेच कारखान्याचे संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी दिली .
खटाव माण सह कराड उत्तर च्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या कारखान्याच्या द्वितीय हंगामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते ऊस मोळी टाकून होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारा हा कारखाना सध्या गळीतासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. कोविड च्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रम खटाव माण साखर कारखान्याचे प्रमुख मान्यवर व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडणार आहे.