निवडीनंतर स्वच्छता मोहिम व भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा : भाजपच्या स्वीकृत नगरसेवक पदी स्वीकृत सदस्यपदी सुनील काळेकर यांची बुधवारी झालेल्या पालिकेच्या ऑनलाईन सभेत नियुक्ती करण्यात आली. सभेच्या पीठासन अधिकारी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी ही घोषणा केली.
नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या ऑनलाईन सभेनंतर नवनियुक्त सदस्य सुनील काळेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट, भाजप गटनेत्या सिध्दी पवार, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे, शहराध्यक्ष विकास गोसावी इ. यावेळी उपस्थित होते.
काळेकर यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी होती. पीठासन अधिकारी माधवी कदम यांनी प्रांतांच्या अर्ज छाननी प्रक्रियेनंतर एकमेव अर्ज वैध ठरल्याने सुनील काळेकर यांच्या नावाची घोषणा केली. भाजप सदस्यांनी या निवडीचे टाळ्या वाजवून या निवडीचे स्वागत केले . नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी काळेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडीनंतर लगेच काळेकर यांनी वॉर्ड क्रं 7 मध्ये स्वच्छता मोहिम राबवावी व सातारा शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी काळेकर यांनी निवेदनाद्वारे नगराध्यक्षांकडे केली. काळेकर मित्र समूहाच्या वतीने रविवार पेठ परिसरात या निवडीबद्दल फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.