महाराष्ट्र न्यूज सातारा- राहुल ताटे पाटील
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे मत
सातारा रहिमतपूर रस्ता प्रवास करणाऱ्यांसाठी धोकादायक स्थिती मध्ये असून अनेक वर्षापासून रस्ता रुंदीकरणाचे काम प्रलंबित स्थितीमध्ये असून प्रशासनाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सातारा पासून रहिमतपूर पर्यंत साधारणता 35 किलोमीटर चा रस्ता सातारा व कोरेगाव या दोन तालुक्यात मधून जात असून आज अखेर रहिमतपूर पासून सातारा च्या दिशेने सातारा तालुक्याच्या हद्दीतील मौजे जिहे पर्यंत चे काम काही प्रमाणात पूर्ण झाले असून मौजे तासगाव पासून चिंचनेर पर्यंत रस्ता जैसे थे परिस्थिती मध्ये आहे, पुढे जैतापुर येथील काही दोन ते तीन किलोमीटरचा परिसर वगळता काम जैसे थे परिस्थिती मध्ये आहे, आणि ज्या ठिकाणी आत्ताच्या पावसाळा परिस्थितीमध्ये काम चालू असल्यामुळे ज्या रस्त्याचे काम चालू आहे तेथे अतिशय वाहन चालवण्यास अडचणी निर्माण होत आहेत, दुचाकी गाड्या चिखलामध्ये घसरत आहेत रस्ता रुंदीकरण करताना साईड पट्टीवर भर टाकल्याने दोन मोठ्या गाड्या आल्यास बाजूला गाडी घेताना ती भर टाकलेल्या मध्ये गाड्या अडकण्याचे प्रमाण वाढले आहे.
तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठाले आंबा वड जांभळ इत्यादी मोठमोठाले झाडांची वृक्षतोड रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली होत असताना नंतर त्याच्या बदल्यात वृक्षलागवड कधी करणार याकडेही वनविभागाचे लक्ष दिसून येत नाही.