महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील पिंपरी बु. येथे शनिवार , दि. १० आक्टोंबर २०२० रोजी प्रस्थावित शिवस्मारक उद्यान व परिसर सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले , याचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला .
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे तयार होत असलेल्या , या उद्यान व परिसराच्या सुशोभिकरणासाठी माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती , जिल्हा परिषद सदस्य प्रविणभैय्या माने यांच्या फंडातून ८ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून , लवकरच हे कार्य पूर्णत्वास जाईल .
आजच्या या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने , सुरेश शिंदे सर , दत्तात्रय घोगरे , उमेश शिंदे , श्रीकांत बोडके , बालाजी बोडके , नागेश गायकवाड , सुनील बोडके , समाधान बोडके , भागवत सुतार , हरीभाऊ सुतार , निलेश बोडके , संदीप बोडके , दादाभाई शेख , सुदर्शन बोडके , राहुल शिंदे , दत्तूनाना बोडके , श्रीकांत घोडकर , हनुमंत सुतार , काका बोडके , अक्षय बोडके , दादा घाडगे , प्रणित बोडके , अतुल लावंड , विवेक बोडके , निलेश तात्या बोडके , वर्धमान बोडके , व ग्रामस्थ उपस्थित होते .






















