महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील चिखली येथील डोंबाळे कुटुंबाची त्यांच्या घरी जावून कुटुंबियांना भेटून माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सात्वंन केले.
चिखली गावचे माजी सरपंच व प्रतिष्ठित व्यक्ती चंद्रसेन एकनाथ डोंबाळे ( दादा ) यांचे वृध्दापकाळाने निधन झालेचे समजताच माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी जावून कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले. यावेळी शंकर डोंबाळे, कुंडलिक डोंबाळे, चिखलीचे सरपंच अंकुश भंडलकर, घोरपडे सर , डाॅ.किसन पवार आदी उपस्थित होते.