नागपूर, दि. ४,
नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे मागासवर्गीय अधिष्ठाता यांना संडास साफ करायला लावणारे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी दि. ३ आक्टों. ला मागासवर्गीय आदिवासी असणारे नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या हाती झाडू देऊन संडास साफ करायला लावले, जातीयवादी माज या खासदाराला चढली आहे, पैसा व पदाचा अहंकार असणाऱ्या या खासदाराने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल केला. हे कृत्य अत्यंत निच व निंदनीय असून याचा सर्व पुरोगामी संघटनाद्वारे तीव्र निषेध आणि धिक्कार करीत आहोत.
खासदार पाटील यांची ही कृती नीच जातीय मानसिकता दर्शवणारी असून या खासदाराला जातीचा माज आला आहे, माजोर जातीयवादी खासदार पाटील यास अट्रॅसिटी अंतर्गत ताबडतोब अटक करण्यात यावी ,महाराष्ट्राला मणिपूर घडवण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाहीं . या घटनेमुळे दलित आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून याची गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे.
हॉस्पिटल मध्ये झालेले मृत्यू हे औषधांचा तुटवडा, साधन सामुग्रीचा अभाव, डॉक्टर कर्मचारी यांची कमतरता व इतर कारणांमुळे झालेला असून याला सरकार चे धोरण जबाबदार आहे.शासनाने कंत्राटीकरण खाजगीकरणचा अवलंब केल्यामुळे ही दैनावस्था निर्माण झाली आहे. स्वतः चे अपयश झाकण्यासाठी अशा अघोरी पद्धतीने जातीय मनुवृत्तीने मागासवर्गीयांचा छळ केला जातो अशा घटना या माणुसकीला काळीमा फासणा-या आहे.
या जातीय मानसिकतला वेळीच ठेचण्यासाठी व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ कारवाई करावी अन्यथा दलित आदिवासी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार.याची नोंद घ्यावी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. हेमंत पाटील खासदार यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पत्रकाद्वारे अरुण गाडे, अध्यक्ष, काष्ट्राईब महासंघ, यशवंत माटे विभागीय अध्यक्ष, नागपूर विभाग यांनी मागणी केली आहे.




















