कराड : येथील शनिवार पेठेतील शिवराय दुर्गभ्रमण मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त कराड तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व दुर्गप्रेमी मावळ्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कराड तहसील कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला.
शिवराय दुर्गभ्रमण मंडळाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मंडळाचे मार्गदर्शक व इतिहासाचे गाढे अभ्यासक के.एन. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षात सदस्यांनी महाराष्ट्राच्या काना-कोपर्यातील तब्बल 165 गडकोट किल्ले पूर्ण केले आहेत. शिवराय दुर्गभ्रमण मंडळाच्या दुर्गप्रेमाची दखल घेऊन कराड तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कराड तहसील कार्यालयात सर्व दुर्गप्रेमी कार्यकर्त्यांचा शिवसेना पदाधिकार्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी दादा पवार, सुनील घोरपडे, सचिन देसाई, महेश सुर्यवंशी, रुपेश देसाई, अजित घोरपडे, सयाजी माने, महेश चव्हाण, रवींद्र देसाई, सतीश मुळीक, संजय मुळीक, इंजोजीराव शेडगे, धनंजय मुळीक, अॅड.सचिन देसाई, गणेश देसाई यांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, संजय गायकवाड, सुनिल पाटील, शंकर वीर, माजी शहरप्रमुख प्रमोद वेर्णेकर, राजेंद्र माने, विभागप्रमुख प्रविण लोहार आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत काकासाहेब जाधव यांनी केले तर आभार महेश सुर्यवंशी यांनी मानले.