महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी
मराठा आरक्षण स्थगिती रद्द करून आरक्षण चालू करा अन्यथा राजे प्रतिष्ठान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा राजे प्रतिष्ठान कराड उत्तरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सदर निवेदन कराडचे तहसीलदार यांना देण्यात आले असल्याची माहिती राजे प्रतिष्ठानचे कराड उत्तरचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी दिली.
प्रवीण पवार पुढे म्हणाले, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल होत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती व नोकर भरतीतील आरक्षण कायम ठेवावे. यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करावे आणि आरक्षण स्थगिती ठेवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्यासोबत आहे याची जाण ठेवावी व मराठा समाजाचा न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
असून याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यात राजे प्रतिष्ठान रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोषदादा घाडगे,कराड उत्तरचे अध्यक्ष प्रवीण पवार ,उपाध्यक्ष आदींच्या सह्या आहेत. यावेळी राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















