महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : फलटण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष तर्फे फलटण तालुक्यात सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे .आज आदर्की येथे भाजपचे सरचिटणीस सुरेश निंबाळकर यांच्या सहकार्याने १५० झाडांचे वृक्षारोपण माध्यमिक विद्यालय मध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व वाठार चे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट यांच्याअध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. आदर्की येथील शाळेच्या समोर १५० विविध प्रकारचे झाडे लावून तसेच गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अशा अनोख्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी फलटण तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, फलटण नगरीचे माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, कोरेगाव तालुका किसान मोर्चा उपाध्यक्ष सचिन जाधव, आदर्की खुर्द चे उपसरपंच दत्तू कांबळे, उद्योजक आघाडीचे सचिन राक्षे, नवल जाधव व ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.