महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकाच्या निषेधार्थ पाटण तहसील कार्यालयाच्या पायरीवर शेतकऱ्यांनी ठिय्या धरून प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या बरोबर आज दि.- १३ आक्टोंबर मंगळवारी रोजी बॅंक आधिकाऱ्यांची बैठक लावण्याचे आश्वासन प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिले होते. मात्र हि बैठक न लावून प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून चेष्टा केली आहे. येत्या दोन दिवसांत यावर ठोस निर्णय प्रशासनाने घेतला नाही तर याचे गंभीर परिणाम बॅंका आणि प्रशासनाला भोगावे लागतील असा सज्जड इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विकास हादवे, जगन्नाथ पाटील, नंदकुमार आरेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड व पशूधन किसान क्रेडिट कार्ड या योजना सुरू केलेल्या असताना काही राष्ट्रीयकृत बॅंका व जिल्हा बॅंका शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ व समज घेऊन शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड देण्यास टाळाटाळ करत आहेत. यासंदर्भात बँकाच्या आधिकाऱ्यां बरोबर शेतकऱ्यांची बैठक लावण्याचे आश्वासन पाटणच्या प्रातांधिकारी यांनी दिले होते.
मात्र हि बैठक न लावता प्रांतानी शेतकऱ्यांची फसवणूक करून एक प्रकारे चेष्टा केली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात परतीच्या आवकाळी पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रिड नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास या पावसाने नाहिसा केला आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी झाली असून पिकांना कोंब यायला लागले आहेत. या संदर्भात शासनाच्या कृषी विभाग अथवा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कोणतेच धोरण दिसत नाही. तालुक्यात केवळ मंत्री आणि प्रांताधिकारी यांच्या सतत होणऱ्या बैठका या बैठकातून शेतकऱ्यांच्या हिताचे काय-तरी साध्य करा. असे विक्रमबाबा पाटणकर यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासन निर्णय अद्यादेश आदेश क्र- 1-20/2018 या शासन निर्णयाने जी व्यक्ती पंतप्रधान सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत त्या प्रत्येकाला १.६० पर्यंत विना तारण कर्ज व १.६० लाखाच्या वरील कर्ज अदा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आसताना स्थानिक व पक्षीय राजकारण मधे बैंका गुरफटत असून आनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणारे आहे. व हि बाब शेतकरी व राष्ट्रहिताच्या विरोधी असून जर का शेतकऱ्यांची आडवणूक केल्यास व शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ न दिल्यास शेतकऱ्यांचे पैसे बैंकां वापरत आसल्यामूळे बैंकावर शेतकऱ्यांचे पैसे वापरले म्हणून दरोड्यांचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेवटी त्यांनी यावेळी केली.