महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कऱ्हाटी
काऱ्हाटी ( ता बारामती ) येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांमध्ये पाणी साचून पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शासनाच्या वतीने पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसापासून मुसळधार बरसत असलेल्या पावसामुळे परिसरातील शेती बाधीत झाली आहे. यामध्ये चालू हंगामातील पिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी यांच्याकडून बाधित झालेल्या क्षेत्राचे प्रत्यक्षदर्शी पंचनामे सुरू केले आहेत. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तहसीलदार यांनी दखल घेऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ग्रामसेवक दीपक बोरावके, कृषी सहाय्यक देविदास लोणकर, तलाठी भुसेवाड, धीरज लोणकर, शेखर खंडाळे,यांच्या टीमने पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. यावेळी सरपंच बी.के. जाधव ,माजी उपसरपंच अशोक लोणकर,विजय चांदगुडे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी मदत केल्याचे कृषी अधिकारी देविदास लोणकर यांनी सांगितले.