महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे
काल दिवस भर झालेल्या पावसामुळे मायणी मल्हारपेठ ते पंढरपुर रोडवर जो भराव टाकला होता तो पुन्हा वाहुन गेला आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली मागील महिन्यात हा भराव अनेकदा वाहुन गेला होता महत्वाचे म्हणजे ह्या रोडवर प्रवासी संख्या जास्त आहे आसपासच्या वाढ्या वस्त्याना जोडनारा प्रमुख मार्ग असल्याने प्रवाशाना प्रवास करताना अडचणी येत आहेत
मायणी मल्हारपेठ ते पंढरपुर रोडला जोडणारा प्रमुख मार्ग आहे वाहुन गेलेला भराव लवकरात लवकर दुरुस्त करावा ठेकेदारच झालेल दुर्लक्ष समोर आल आहे अनेकदा हा भराव वाहुन गेला तात्पुरती मलमपट्टी काहीसुध्दा कामाची नाही अनिल जाधव मायणी ग्रामस्थ
प्रवासी वर्गा बरोबर व्यापारी वर्गाचाही मोठ्या प्रमाणवर मोठ नुकसान झाले आहे लहान मोठे व्यापारी ह्या रोडवरून प्रवास करत असतात परंतु भराव वाहुन गेल्याने ये जा करण्यासाठी अडचणी येत आहेत