आज दिनांक ३० मे रोजी वाई पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहामध्ये वाई तालुका नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी आढावा बैठक वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी वाई चे तहसीलदार रणजीत भोसले साहेब नायब तहसीलदार वैशाली जायगुडे-घोरपडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे साहेब तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व सर्व सर्कल उपस्थित होते यावेळी बोलताना जाधव साहेब म्हणाले की ज्या विभागांचा आराखडा देणे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आराखडा तहसीलदार ऑफिसला जमा करणे गरजेचे असून नैसर्गिक आपत्ती काळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या नियंत्रण कक्षात हजर राहणे गरजेचे आहे तहसीलदार भोसले साहेब यांनी तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आराखड्या विषयी माहिती घेतली यामध्ये बांधकाम विभागात आपत्ती विभाग स्थापन केला असून मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्ता वाहून जाण्याचे प्रकार झाले होते त्या ठिकाणची सर्व कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले बांधकाम विभागाला आपत्ती काळात लागणारे आपले जेसीबी व इतर साधन सामग्री तयार ठेवण्याचे आदेश भोसले साहेब यांनी दिले धोम धरण व बलकवडी धरण या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते अशा अपघात होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी पर्यटकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले पंचायत समितीच्या आरोग्य विभागास साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध करून ठेवण्याचे ही आदेश दिले कृषी विभागास खताचा तुटवडा होऊ न देणे व बियाणांचा साठा पुरेसा करून ठेवणे तसेच शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले पावसाळा काळात डोंगर व धबधब्यांवर तसेच मासेमारीसाठी पर्यटक जात असतात अशा पर्यटकांना अपघात होऊन आपला जीव गमवावा लागू नये यासाठी पोलिस बीट आमलदार व ज्यात्या गावातील पोलीस पाटील यांनी सतर्क राहण्याच्या सूचना ही देण्यात आल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही ज्या ठिकाणी पाणी साठते अशा ठिकाणच्या लाईटचे ट्रांसफार्मर चा शॉक पाण्याला लागणार नाही यासाठीच्या उपाययोजना करण्याचे सांगितले वाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे साहेब यांनी मोठा पूल १५ जून ते १ जुलै पर्यंत वाहतुकीसाठी सुरू होईल असे सांगितले शहरातील धोकादायक इमारतींचे ऑडिट केले असून पावसाळ्याआधी त्या खाली घेतल्या जातील तसेच नदीकाठच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पूर काळात सुरक्षित जागी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच शहरातील ड्रेनेज चे काम पूर्ण होत आल्याचेही सांगितले यावेळी सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला व ज्यात्या विभागांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या.