नवारस्ता प्रतिनिधी : पाटण तालुका हा ग्रामीण भाग असला तरी या भागात बऱ्याचशा खेड्यांमध्ये शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकरी हेच छोटे-मोठे व्यवसायिक आहेत असे प्रतिपादन चंद्रशेखर निकम यांनी सरस्वती महिला शेतकरी मल्टीपर्पज निधी बँक नवारस्ता येथे आयोजित केलेल्या शेतकरी विकास चर्चासत्र मध्ये केले.
शेतकऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी काय करायला हवे आणि त्यासाठी शेतीतून उत्पन्न कोणत्या पद्धतीने वाढवले पाहिजे तसेच शेतीसाठी लागणारे भांडवल कसे उभे करता येईल व शेतकरी भाजीविक्रेते आहेत त्यांच्यासाठी आपली संस्था कोणत्या प्रकारे उपयोगी पडेल या संदर्भात चर्चा तसेच शेतकऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची गरज असल्याने भांडवल उभे करण्यासाठी मोठ्या बँकेतील सिबिल, जमीनदार आणि बँक स्टेटमेंट अशा खूप साऱ्या कागदपत्रांची तडजोड ही शेतकऱ्यांना करावी लागते. तर यावर कोणती उपाय योजना करता येईल यावरही सर्वांना उपयोगी पडेल अशी माहिती चर्चासत्रातून देण्यात आली एकंदरीत आलेले सर्व शेतकरी व्यवसायिक मिळालेल्या माहितीतून समाधानी झालेत. यावेळी अध्यक्ष श्री. चंद्रशेखर निकम, उपाध्यक्ष सत्रे, संचालक राजेश पवार, सल्लागार सौ निर्मला कोळेकर, संतोष शेजवळ, सचिन भिसे, दत्तात्रय माथने, शिवाजी कोळेकर, उत्तम माथने, समीर मुलानी, पायल नायर, अमर जाधव व मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.