महाराष्ट्र न्यूज लोणंद / बिलकीस शेख :
20/10/2020 रोजी सायंकाळच्या सुमारास बडेखान बस स्थानकावर एक 18 ते 19 वयोगटातील मुलगी रडत बसलेली रूपाली नबाजी जाधव राहणार घाडगेमळा यांना दिसून आली तिला काहीतरी अडचण असावी हे त्यांच्या लक्षात आले नंतर त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर मुलीचे जवळ जाऊन तिचे कडे विचारपूस केली असता तिने आपले नाव सरिता विष्णू गहला राहणार आशागड डहाणू जिल्हा पालघर असे सांगून मला माझे घरी जायचे आहे असे सांगितले सदर महिलेने रात्रीची वेळ असल्याने सदर मुलीस त्या दिवशी आपले घरी ठेवून दुसरे दिवशी त्यांनी व प्रदीप झनझणे, महेंद्र घाडगे यांनी सदर मुलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्री तानाजी बरडे यांना भेटून वरील हकीकत सांगितली .

उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बरडे यांनी सदर मुलीच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तात्काळ निर्भया पथक फलटण डिव्हिजन यांना बोलावून घेऊन सदर मुलीची पूर्ण माहिती घेऊन तिला तिचे नातेवाइकांचे ताब्यात देणे बाबत आदेश केले निर्भया पथक यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली psi भंडारे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभवी भोसले,, महिला पोलीस नाईक सविता अगम पोलीस नाईक संदीप मदने यांनी सदर मुलीची संपूर्ण माहिती घेऊन तारीख 22/10/2020 रोजी डहाणू जिल्हा पालघर येथे जाऊन सदर मुलीस तिची आजी लक्ष्मी गणपत गिंबल यांचे सुखरूप ताब्यात दिली सदरची मुलगी ही मतिमंद असून तिचे आई वडील मयत झाल्याने तिचा सांभाळ तिची आजी करत होती सदरची मुलगी ही चार महिन्यापासून बेपत्ता होती परंतु घरची परिस्थिती हालाखीची व आजी वयोवृद्ध असल्याने तिची तक्रार व शोध घेऊ शकले नाहीत परंतु आपली नात मिळून आले नंतर मुलीचे आजी आजोबा यांनी निर्भया टीमचे आभार मानले व सदरची मुलगी तिचे घरी सुरक्षित पोहोचली






















