महाराष्ट्र न्यूज वाठार स्टेशन प्रतिनिधी : मुकुंदराज काकडे
वाठार स्टेशन येथील मंगेश शितोळे यांची भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडी कोरेगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन विष्णू साळुंखे यांनी मंगेश शितोळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून व पक्षबांधणीला प्राधान्य देवून ही निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या सूचनेनुसार शितोळे यांची ही निवड करण्यात आली.
मंगेश शितोळे हे उत्तर कोरेगाव तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न मांडण्यामध्ये सतत अग्रेसर असतात. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यामध्ये वेळोवेळी शितोळे कायम आघाडीवर असतात. तसेच समाजाउपयोगी कार्यक्रमही मंगेश शितोळे राबवित असतात. याच पार्श्वभूमीवर मंगेश शितोळे यांची निवड ही भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीच्या कोरेगाव तालुका उपाध्यक्षपदी करण्यात आली यावेळी आ. जयकुमार गोरे यांनी मंगेश शितोळे यांना नियुक्ती पत्र देवून सन्मानित केले. मंगेश शितोळे यांचे या निवडीबाबत विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. त्याचप्रमाणे यावेळी व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन विष्णू साळुंखे ,जिल्हाउपाध्यक्ष मनोज कलापट ,उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, जिल्हा सरचिटणीस महाडवाले,कोरेगाव तालुका उपाध्यक्ष राजेश काळोखे ,दडस शितोळे यांच्या निवडीवेळी हजर होते.
निवड झाल्याबद्दल खा.उदयनराजे भोसले,खा.रणजित नाईक निंबाळकर, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, तालुका अध्यक्ष संतोष जाधव व वाठार स्टेशनचे येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.






























