महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :वालचंदनगर
वालचंदनगर येथील शेतकऱ्याने ३ एकर क्षेत्रात डाळींब पिकवीत तब्बल १५ टन उत्पादन घेतले. मात्र लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. निर्यातक्षम उत्पादन काढूनही अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
वालचंदनगर येथील शेतकरी कुमार नामदेव गायकवाड यांनी त्यांच्या शेतात भगवा डाळिंब पीक घेतले यावर्षी तिसरा भार होता. अगदी एक्स्पोर्ट
( निर्यातक्षम )करावा असे उत्पादन घेतले खरे मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सगळीकडे क्षेत्रीय बंधने आली.वाढत्या लॉकडाऊनमुळे आणि गेल्या तीन चार महिन्यांपासून पावसाळी वातावरण यासारखे नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे डाळिंबाचे वजन म्हणावे इतके वाढले नाही. डाळिंबाला प्रतिकिलो ९० ते १०० रुपये दर अपेक्षित असताना डाळिंब फक्त ४५ रुपये दराने विक्री झाले.सध्या १५ टन माल निर्यात झाला असून अजून १० टन उत्पन्न निघेल मात्र कोरोनाचा फटका बसला असल्याने डाळिंब उत्पादन चांगले निघूनही अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.