महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (फलटण)
फलटण शहरातील सर्व व्यापारी संघटना यांनी 12 ते 17 सप्टेंबर 20 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यूचे आयोजन रद्द केल्याचे पत्र फलटण उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे त्यांनी सांगितल्या प्रमाणे 6 सप्टेंबर रोजी फलटण शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूचे आयोजन करण्याबाबत एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू चे आयोजन करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला होता व तसे पत्र अधिकारी फलटण यांना देण्यात आले होते.
परंतु काही अपरिहार्य कारणामुळे सदरचा पुकारलेला जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी मागे घेतला आहे .परंतु यापुढे कधीही कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने जनता कर्फ्यू जाहीर केल्यासं त्यास फलटण शहरातील सर्व व्यापारी संघटना सहभागी होती. या निवेदनावर मंगेश दोशी ,फलटण तालुका व्यापारी असोसिएशन, दिगंबर कुमठेकर, फलटण व्यापारी असोसिएशन, प्रमोद निंबाळकर फलटण बिल्डर असोसिएशन, वसीम मणेर, फलटण व्यापारी असोसिएशन ,अनिल शिरतोडे फलटण तालुका मोबाइल असोसिएशन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत