महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
गुहागर पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील पाटण तिकाटणे वारूंजी ते विजयनगर आर. टी. आे आॅफिस या मार्गावर फेब्रुवारी २०२० रोजी रस्त्याच्या मधील दुभाजकावर एल अँड टी कंपनी मार्फत ७० वँटचे दोन बल्ब असलेले १०७ स्ट्रीट लाईटचे खांब उभे केले होते. परंतु दोन वर्षे उलटून सुध्दा ते सुरू केले गेले नव्हते. ते सुरू करावेत या मागणीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी सातत्याने मंत्री शंभूराज देसाई व महामार्ग कार्यालय अडूळ. ता पाटण येथे पाठपुरावा केला होता व लवकर सुरु न केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला होता. यांची दखल घेऊन बजाज कंपनी मार्फत या मार्गावर गोटे हद्दीत खुशबू हाॅटेल समोर तसेच मुंढे हद्दीत साळवे मळा व विजयनगर हद्दीतील आर.टी.ओ ऑफिस समोर असे तीन नविन डि. पी बसवण्यात आले आसून लवकरच स्ट्रीट लाईक सुरू करण्यात येणार आहे.
तसेच स्ट्रीट लाईट सुरू झाल्यानंतर अंधारामुळे होणारे अपघात व चोरीचे प्रमाण कमी होवून परिसरातील केसे, पाडळी, वारूंजी, गोटे मुंढे, विजयनगर, सुपने या गावांना याचा फायदा होईल. असा विश्वास काकासाहेब जाधव यांनी व्यक्त केला आहे.