महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील निमसाखर व परिसरातील बहुतांशी शेतकरी यांनी बाजरीचे पिक शेतात घेतले आहे . सदरचे पिक अत्यंत चांगले आले असल्याने शेतकरी वर्गात समाधनाचे वातावरण आहे . इंदापूर तालुक्यात व निमसाखर परीसरात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे . पाऊस मुबलक झाला असल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने बाजरीची पेरणी केली आहे .
सध्या दुकानात बाजरीची विक्री २२ ते २५ रूपये दराने होत आहे . बाजरीचे पिक जोमात असल्याने या भागातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे