महाराष्ट्र न्यूज महाबळेश्वर प्रतिनिधी:अजित कुंभारदरे
सध्या कोविड 19 नियंत्रणात आहे परंतु गर्दी मुळे पुन्हा जर कोविडचा प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटन स्थळाना पुन्हा लाॅकडाऊन जाहीर करावा लागले असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीं महाबळेश्वर येथे बोलताना दिला या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा हे देखिल उपस्थित होते
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर महाबळेश्वर शहर विकास आराखडा आढावा बैठक पार पडली या बैठकीस प्रांताधिकारी संगिता राजापुरकर , पर्यवेक्षाधिन अधिकारी मनिषा आव्हाळे , तहसिलदार सुषमा चैधरी पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील आदी उपस्थित होते . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे काही महीन्यां पुर्वी महाबळेश्वरला आले होते त्या वेळी नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदेे यांनी वेण्णालेक परीसर विकास आराखडा सादर करून या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती या वेळी वेण्णालेक सह महाबळेश्वरच्या विकासाचा उत्तम आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सुचना करून या सुधारित विकास आराखडयास 100 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला होता या आराखडयास लागणारा निधीची उपमुख्यमंत्र.ी अजित पवार यांनी राज्याच्या अंदाज पत्रकात तरतुद केली होती परंतु कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढला आणि देशात लाॅक डाउन जाहीर झाले त्यामुळे या विकास आराखडया संदर्भात काहीच हालचाली झाल्या नाहीत परंतु आता हळु हळु सर्व पुर्वपदावर येत आहे महाबळेश्वरचा विकास आराखडयावर काम सुरू झाले आहे तेव्हा या संदर्भात काही सुचना असतील तर सांगा अशी विनंती जिल्हाधिकारी यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या नगरसेवकांना व व्यापारी यांना केल
वेण्णालेक येथे सायंकाळ नंतर शुकशुकाट पसरतो या ठिकाणी जर लेझर शो सुरू करण्यात आला तर येथील व्यवसायिकांना रात्री नउ पर्यंत व्यवासाय मिळेल अशी सुचना नगरसेवक कुमार शिंदे यांनी केली तसेच वेण्णालेक येथील पुल बांधुन बायपास सुरू करावा तसेच टोल नाक्याच्या जागेवरून पालिका व वन विभाग यांच्यात वाद सुरू आहे या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालावे अशी मागणीही कुमार शिंदे यांनी केली नगरसेवक युसूफ शेख यांनी पांचगणी दांडेघर टोल नाक्यावर महाबळेश्वरचा टोलही जबरदस्तीने वसुल केला जातो या कडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले.
जिल्हयाचे पालक मंत्री ना बाळासाहेब पाटील आ मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरचे पाॅईंट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी केली तसेच याचा पाठपुरावाही चालु ठेवला येथील घोडे व्यवसायिक , टॅक्सी संघटना , व्यापारी , हाॅटेल व्यवसायिक यांनी देखिल ही मागणी केली होती तसेच आता लवकरच दिवाळी हंगाम सुरू होत आहे या सर्व बाबी लक्षात घेवुन मी दोन दिवसात पाॅईंट सुरू करण्यास परवाणगी देणार असल्याची माहीती या बैठकित जिल्हाधिकारी यांनी दिली महाबळेश्वर येथे पर्यटन वाढी पेक्षा पर्यटकांना ज्या सोई सुविधा मिळतात त्याच्या दर्जामध्ये वाढ करण्याची गरज आहे महाबळेश्वर येथे आल्या नंतर पर्यटकांचा बराच वेळ टोल नाक्यावर जातो या ठिकाणी वाहतुक कोडी होते म्हणुन पर्यटकांना आॅललाइन टोल भरण्याची सुविधा पालिकेने सुरू करावी अशी सुचना करून वेण्णालेक येथे पालिके बरोबरच वन विभागाचाही टोल वसुल करतात एकाच ठिकाणी दोन विभागांची टोल वसुली कशी होते या बाबत जिल्हाधिकारी यांनी आश्चर्च व्यक्त केले.
र्पाॅइंटवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे संरक्षक कठडे असले पाहीजे त्या ठिकाणी स्वच्छता गृह प्रकाश व्यवस्था बैठक व्यवस्था वाहन लावण्यासाठी जागा पाॅईंचे नाम फलक व माहीती फलक असावे खाजगी बस साठी वाहनतळ मिळावा अशा मागण्या या वेळी नगरसेवकांनी केल्या या चर्चेत नगरसेवक किसनराव शिंदे प्रकाश पाटील विमल पार्टे यांनी सहभाग घेतला या वेळी नगरसेविका विमल ओंबळे शारदा ढाणक सुनिता आखाडे श्रध्दा रोकडे अर्बन बॅकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे जावली बाजार समितीचे दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.