महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पिंपोडे बुद्रुक:
सातारा तालुका शिक्षक समितीच्या वतीने ४ ऑक्सिजन मशीन शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिल्या.त्याचा उदघाटन सोहळा बुधवारी राज्याध्यक्ष श्री.उदय शिंदे यांच्या शुभहस्ते , जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षक बँकेचे संचालक श्री किरण यादव यांच्या उपस्थितीत शिक्षक भवन सातारा याठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात कै. बाळकृष्ण बागल व कै.राहुल सावंत यांना एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करून झाली.
यावेळी सॅनिटायझर बॉटल्स, ऑक्सीजन लेवल चेक करण्याच्या ऑक्सिमीटर मशिन्स,ताप चेक करण्याच्या गन सातारा तालुक्यात विभागवार उपलब्ध करून देण्यात आल्या.
सातारा तालुक्यातील शिक्षक समितीच्या सभासदांच्या वतीने एक लाख ऐंशी हजार रुपये निधी जमा झाला.
यासाठी सातारा तालुका शिक्षक समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री अनिल चव्हाण व त्यांची संपूर्ण कार्यकारणी तसेच शिक्षक समितीचे सर्व सभासद यांनी विशेष कष्ट घेतले.
सातारा तालुका शिक्षक समितीच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल व स्तुत्य उपक्रमाबद्दल राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे यांनी आपल्या मनोगतात कौतुक केले.
त्याग आणि सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारी शिक्षक समिती नेहमीच सेवेसाठी उपलब्ध आहे असे श्री शंकर देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
शिक्षक बँकेचे संचालक श्री किरण यादव यांनी मशीन बद्दल माहिती देऊन ती कशी जोडावी याचा डेमो दाखविला.
याप्रसंगी श्री अनिल कांबळे संचालक कराड पाटण शिक्षक सोसायटी केंद्रप्रमुख श्री रमेश लोटेकर, श्री रामचंद्र गायकवाड, श्री भूरकुंडे सर, श्री सातपुते सर व शिक्षक श्री लक्ष्मण ढाणे, श्री राजेंद्र शेलार श्री धनंजय ढाणे, श्री किशोर ढाणे ,श्री अनिल अशोक चव्हाण श्री तानाजी सराटे श्री बंडु थोरात, श्री संजय काटाळे, श्री संतोष लोहार श्री राजेंद्र बोबडे, श्री प्रवीण क्षीरसागर, सातारा तालुक्यातील शिक्षक समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.