महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
कळंब ( ता. इंदापूर ) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांची मुदत संपली असल्याने प्रशासक बगाडे व ग्रामसेवक घोगरे हे अधिकारी सध्या ग्रामपंचायतीचे कामकाज पाहत आहेत. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राशेजारी देवीच्या देवळाजवळ पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने सतत परिसरात पाण्याचे डबके साचून राहत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होवून रोगराई वाढत आहे.
ग्रामपंचायतीस वारंवार सुचना देवूनही ग्रामपंचायत प्रशासन जाणून- बुजून यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दत्तात्रय वाघमोडे यांनी सांगितले आहे व सदर पाईपलाईन लवकरात लवकर दुरूस्त न केल्यास आंदोलन करणार असल्याचेही सांगितले.
गावातील अंतर्गत रस्ते, मुख्य चौकातील हायमास्ट बंद दिवा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय असे अनेक प्रलंबित प्रश्नांकडे ग्रामपंचायत प्रशासन व गावातील प्रमुख नेते कधी लक्ष देणार हा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.