महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
कोरोना परिस्थितीचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाबरोबरच प्रत्येक जण या लढ्यामध्ये आपापल्या परीने सहकार्य करत आहे, त्यामध्येच गेली 15 वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणारे सातारा कोडोली येथील कोडोली कृतज्ञता मंच यांचेवतीने कोडोली व परिसरातील लोकांसाठी तीन पोर्टेबल ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
या ऑक्सीजन मशीन गरजू व गरीब पेशंटना विना मोबदला मिळणार आहेत
डॉ. शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या मशीन पेशंटला जोडण्याची व्यवस्था केली गेली आहे.यावेळी कृतज्ञता मंचचे जगदीश शिर्के (भाऊ), संजय निकम, विजय देशमुख, गणेश काटे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.