राणंद तलावातील माती चोरणारे दोन डंपर आणि दोन ट्रॅक्टर केले जप्त
दहिवडी : ता.२६
माण तालुक्यातील सोकासन येथे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत राणंद तलावातील माती चोरी करणारे दोन डंपर आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले.
घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राणंद सोकासन हद्दीवर उरवणे शेताजवळ अनधिकृत माती वाहतूक करताना सोनालिका डी -१ 47RX व स्वराज 744FE असे दोन ट्रॅक्टर व एम एच -११ डी डी ०८६९ व एम एच ११ डी डी ३३३९ असे दोन डंपर भरारी पथकाने पकडले.
चौकशी केली असता सदर डंपर आणि ट्रॅक्टर मालकाकडे माती वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे दोन ट्रॅक्टर आणि डंपर दहिवडी पोलीस कवायत मैदानात कारवाई करता जमा करण्यात आले आहेत.
ही कारवाई माण-खटावच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर , तहसीलदार विकास आहिर आणि तलाठी गुलाबराव उगलमोगले यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले होते.
अचानकपणे भरारी पथकाने ही कारवाई केल्यानंतर माणचे महसूल पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात होणारी वाळू चोरी रोखण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे माती चोरांसह वाळू चोरांवर महसूल प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे आता संबंध तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.