महाराष्ट्र न्यूज – ब्रेकिंग
सातारा :- राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदार संघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार विलासकाका पाटील – उंडाळकर यांचे उपचारादरम्यान वयाच्या 84 व्या वर्षी सोमवारी पहाटे सातारा येथे निधन झाले. त्यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.