महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गणेश पवार
फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि ४
रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी तालुक्यातील रावडी खुर्द या गावचे सात पैकी सात जागा बिनविरोध जाहीर झाल्या असून ग्रामपंचायत वरती पुन्हा एकदा राजे गटाचे वर्चस्व अबाधित राहिले आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर सात जागांसाठी एकूण १७ अर्ज दाखल झाले होते मात्र भगवान होळकर, बापूराव करचे, दिलीप निकाळजे व हरिभाऊ होळकर यांच्या सहकार्यातून व सलक दहा दिवसाच्या बैठकीच्या फेर्यामधून अखेर आज सात जागांवर बिनविरोध करण्याचे शिक्कामोर्तब झाले व पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या.
वार्ड निहाय सदस्य पुढीलप्रमाणे
वार्ड क्र १
भगवान दादासो होळकर
संध्या दिलीप निकाळजे
राणी नवनाथ होळकर
वार्ड क्रमांक२
मनिषा संतोष कर्चे
आकाश रवलनाथ होळकर
वार्ड क्रमांक ३
मधुकर मारुती मदने
गीतांजली राजाराम शिंदे






















