महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(पिंपोडे बुद्रुक)
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे व शिक्षणासंबंधीचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत.संघटनेने या विविध प्रश्नांसंबंधी वेळोवेळी निवेदने देऊन चर्चा केली आहे.परंतु ती पूर्तता करण्याचे केवळ आश्वासन दिले जाते.त्याची पूर्तता होत नाही तसेच प्राथमिक शिक्षकांच्या काही समस्या तर अधिक जटील बनत चालल्या असून प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत असल्याने विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व सिंधुदुर्ग जिल्हा समितीच्या वतीने ओरोस सिंधुदुर्ग येथे उदय सामंत उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले
यावेळी महाराष्ट्रराज्य शिक्षक समिती अध्यक्ष श्री.उदय शिंदे,उपाध्यक्ष श्री.राजन कोरगावकर,सिंधुदुर्ग शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष श्री.नितीन कदम,सरचिटणीस सचिन मदने, तसेच सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक श्री. किरण यादव आणि जिल्हा शिक्षक समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते























