महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
फलटण तालुक्यातील येणारे १५ तारखेला होऊ घातलेल्या ८० ग्रामपंचायतच्या निवडणुकी पैकी आज एकूण ९७०उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असून१३८ उमेदवार ३६ वार्ड मधून बिनविरोध जाहीर झाले आहेत आता एकूण २२९वार्डात ५७४ जागांसाठी १२७० जण रिंगणात आहेत आहेत.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ ग्रामपंचायत पूर्ण तर १४ ग्रामपंचायत मध्ये प्रभाग बिनविरोध झाले असून यामध्ये वाघोशी, रावडी खुर्द, तडवळे, डोंबाळवाडी, काशीदवाडी, व ढवळेवाडी हि गाव पूर्ण बिनविरोध झाली असून इतर १४ गाव ही प्रभाग निहाय बिनविरोध झाली आहेत ती पुढील प्रमाणे सांगवी प्र २ व ३, विंचुर्णी प्र ३, बोडकेवाडी प्र १ व ३, कोऱ्हाळे प्रभाग २, वडगाव प्रभाग १, कोरेगाव प्र ३, जिंती प्र ४, खुंटे प्र १, पिराचीवाडी प्र ३,गुणवरे प्र ५,आंदरुड प्र २,मिरढे प्र १ शेरेशिंदेवाडी प्र २, निरगुडी प्र १,३,४