महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी /फलटण :
विठ्ठलवाडी (तरडगाव) ता. फलटण येथील बारामती इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक योगीराज खोमणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शिक्षक,कर्मचारी तसेच काही पालकही उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने मात्र उत्साहात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.




















