महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी/ गणेश पवार :
कोरोना काळात राज्य शासनाने होम आयसोलेशन बंद केल्यामुळे मागील तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी ग्रामपंचायत साखरवाडी ला भेट दिली होती या भेटीमध्ये साखरवाडी मध्ये १००बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्याचे ग्रामपंचायतला निर्देश दिले होते त्यानुसार ग्रामपंचायत मार्फत वर्धमान मंगल कार्यालय येथे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे याचे उदघाटन राष्ट्रवादीचे नगर पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली सर्व सोयींनी युक्त उभारल्याने साखरवाडी ग्रामपंचायत चे कौतुक आमदार निलेश लंके यांनी केले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, साखरवाडी सारख्या अनेक गावाने असंच विलगीकरण कक्ष तयार करावेत जेणेकरून एकही कोरोना रुग्ण गावात भविष्यात सापडणार नाही व आपल्या राज्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होईल तसेच साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या विकास कामाचे तोंडभरून कौतुक केले या उदघाटन प्रसंगी न्यू फलटण शुगर चे माजी चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, दिगंबर आगवणे, साखरवाडी चे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य विक्रम ढेंबरे ,अपर्णा बोडरे ,गौरी औचरे, सुषमा गाडे,किर्ती भोसले,हरीश गायकवाड ,मयूर लोखंडे, मंडलाधिकारी भांगे आण्णा, तलाठी खराडे अण्णा ,ग्रामसेवक येळे, साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सोडमिसे,डॉ. चव्हाण, डॉ. आनंद जाधव, संग्राम औचरे,रवी तोरणे, व्यापारी असोसिएशनचे महेश भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दादा जाधव ,रोहन मोहिते ,ग्रामपंचायत कर्मचारी व साखरवाडीतील नागरिक उपस्थित होते