उद्या सोडत, ५४ गावात ओबीसी तर २५ गावे एससी प्रवर्गासाठी
कराड : सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची कार्यवाही सध्या सरु आहे. तालु्क्यातील २०० ग्रापंचायतींचे आरक्षण काढण्यात येणार असुन त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १२० गावे, ५४ गावे नागरीकांचा मागास प्रवर्ग, एक गाव अनुसुचीत जमाती तर २५ गावे अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात येणार आहेत. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आज ही माहिती दिली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाते. यावेळी मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येत आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात शुक्रवारी (ता. २९) सकाळी अकरा वाजता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील २०० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १२० गावे आरक्षीत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ६० गावात महिलांसाठी तर उर्वरीत महिला किंवा पुरुष यांच्यासाठी आरक्षीत करण्यात येतील. त्याचबरोबर तालुक्यातील ५४ गावे नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात येतील. त्यामध्ये २७ महिला आणि उर्वरीत २७ ठिकाणी महिला किंवा पुरुष गावांतील जागांनुसार निवडले जातील. तालुक्यातील एक गाव अनुसुचीत जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षीत केले जाईल. तर २५ गावे अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात येतील. त्यामध्ये १३ गावात महिलांना तर उर्वरित १२ गावात महिलां किवा पुरुष गावातील जागेनुसार निवडले जातील. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता लॉटरी पध्दतीने आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे तहसीलदार वाकडे यांनी सांगितले.