महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी / सुनिल निंबाळकर :
कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचनिमीत्ताने महाराष्ट्रभर प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाच्या सुरूवातीला रक्तदात्याकडून रक्तदान करण्याचा निश्चय करीत आहोत. आपण सर्वांनीच सामाजिक भान राखुया… आपल्या कर्तव्याला जागूया… या चला रक्तदान करूया,असे आव्हान प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे.प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य मिळून सर्व जिल्ह्यात खुप चांगल्या प्रकारे निष्ठेने व एकजुटीने काम करत आहेत, त्याचीच फलश्रुती म्हणुन येत्या 24 जानेवरी ते 30 जानेवारी दरम्यान प्रतिष्ठान मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलेले आहे.
थेंबे थेंबे तळे साचे ह्या म्हणी प्रमाणे काम करून रक्तपेढी मध्ये रक्ताचा साठा जमा करण्यास मदत करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडुया.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, आयोजित रक्तदान शिबिर जिल्हा निहाय माहिती :
1) कोल्हापूर टीम : दि. 24 जानेवारी,शाहूवाडी कोल्हापूर
2) सातारा टीम : दि. 24 जानेवारी बावडा, ता खंडाळा, जि सातारा.
3) पुणे टीम:- दि.25 जानेवारी २०२१ ठिकाण:- मु.पो.काळदरी ता.पुरंदर जि.पुणे
4)सांगली टीम : दि. 26 जानेवारी 2021 ठिकाण:शिगाव ,वाळवा
5)संभाजीनगर टीम : दि 26 जानेवारी 2021,ठिकाण :-तिरुमला कॉम्प्लेक्स ,देवळाई रोड संभाजीनगर
6)धाराशिव टीम : दि. 26 जानेवारी 2021 ठिकाण प्रतिष्ठाण भवन,राजे बाग छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव
7) महा मुंबई टीम : दि. 26 जानेवारी 2021 ठिकाण: केमिस्ट भवन ब्लड बँक,सानपाडा (पूर्व),सेक्टर 8 नवी मुंबई.
8) लातूर टीम : दि.26 जानेवारी नेटिझन्स एकेडमी, लातूर
9)नागपूर टीम :- दि. 26 जानेवारी २०२१.ठिकाण:- शिवाजी नगर मनपा उद्यान, नागपूर.
10) धुळे टीम : दि.26 जानेवारी
सुशीलनगर धुळे
11) बेळगांव टीम : दि.26 जानेवारी ठिकाण- महर्षी वाल्मिकी भवन.साखरवाडी, निपाणी.
12) ठाणे टीम : दि. 28 जानेवारी 2021 रोजी, ठिकाण – रायते गाव, कल्याण.
अशा स्वरूपाचे रक्तदान शिबिर चे नियोजन प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे त्यापैकी प्रतिष्ठाण च्या सातारा टीम ने दि. 24 जानेवारी बावडा, ता खंडाळा, जि सातारा या ठिकाणी रक्तदान शिबीराची सुरुवात प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मा.आश्विनी महांगडे यांनी प्रथम स्वतः रक्तदान करून केली.कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचनिमीत्ताने महाराष्ट्रभर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाच्या सुरूवातीला रक्तदात्याकडून रक्तदान करण्याचा निश्चय केला गेला, त्याच अनुषंगाने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातारा टीम तसेच ससून हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा विभागाकडून दि.२४ जानेवारी २०२१ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमात 93 रक्तदात्यांनी रक्तदान केले या उपक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मा.आश्विनी महांगडे ,सातारा जिल्हा प्रवक्त्या मा.कल्याणीताई रणसिंग, सातारा जिल्हा संघटक मा.अमर कुंभार, सातारा जिल्हा समन्वयक मा.साईप्रसाद फुले, ससून हॉस्पिटलचे डॉ अभिषेक मुळे, डॉ दीपाली पाटील ,सातारा जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार ,रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सदस्य ग्रामस्थ पदाधिकारी इ. उपस्थित होते. प्रतिष्ठानचे मुख्य उद्देश
(|| अखंड सेवेचे ठायी तत्पर ||)