महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :
ओगलेवाडी ता.कराड उत्तर मधील विविध विकास कामाची भूमिपूजने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुढील आठवड्यात होणार आहेत. अशी माहिती रामकृष्ण वेताळ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिलेली आहे.सुमारे 15 कोटींचा विकास निधी मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत कराड उत्तरेतील विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये. भाजप नेत्यांमुळेच हा निधी उपलब्ध झाला असल्याने या कामांची भूमिपूजने करण्याचा हक्क ही फक्त भाजप नेत्यांनाच आहे. असे वेताळ यांनी सांगितले.
कराड उत्तर मतदारसंघातील सुर्ली पाटी ते कामथी ते पाचुंद रस्ता, गजानन हाउसिंग सोसायटी गणपती मंदिर ते विरवडे,करवडी रस्ता,शिवडे ते भवानवाडी रस्ता आणि मरळी ते भगतवाडी रस्ता या रस्त्यांच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी 15 कोटी पेक्षा जास्त निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंजूर झालेला आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी कराड उत्तर भाजपाच्या वतीने आम्ही गिरीश महाजन यांना निवेदन दिले होते.अनेक गावांना स्वातंत्र्यानंतर 75 वर्षातही रस्ता झालेला नाही.याबाबतची सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर कथन केली होती.आम्ही केलेल्या पाठपुरावामुळेच या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असल्याने याचे भूमिपूजन करण्याचा अधिकार ही फक्त आम्हालाच आहे.
इतरांनी केलेली आणि मंजूर करून आणलेली कामे आम्हीच केली असे सांगून काही लोक या कामाची नाहक भूमिपूजने करीत आहेत.कोणतेही काम स्वतः करायचे नाही आणि इतरांनी केले की ते आम्हीच केले असे भासवून त्याचे भूमिपूजन करून श्रेयवाद लाटायचा. ही वृत्ती कराड उत्तर मध्ये बळावत चालली आहे.या सर्व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या विकास कामांची भूमिपूजन करण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्री गिरीश महाजन हे कराड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते या विकास कामांची भूमिपूजन पार पडणार आहेत. या प्रकारची माहिती रामकृष्ण वेताळ यांनी निवेदनात दिलेली आहे. चौकट
स्वतः केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे.
कराड उत्तरेतील अनेक विकास कामांसाठी कराड उत्तरेतील भाजप कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि माजी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि भाजप नेते मनोज घोरपडे यांच्या सहकार्याने हा निधी प्राप्त झाला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे निधी उपलब्ध करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.मात्र काही लोक कोणतेही काम आम्हीच केले असे भासवून भूमिपूजनाचे नारळ फोडत आहेत. अशा लोकांनी स्वतः केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे, इतरांचे नाही .
रामकृष्ण वेताळ ,प्रदेश सरचिटणीस, भा. ज.पा. किसान मोर्चा.
( रामकृष्ण वेताळ यांचा आयकर साईज फोटो वापरणे)