सातारा : सातारा येथील कोडोली सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेवकांची बैठक, आरोग्य सेवकांवर झालेल्या विविध विषयांवर चर्चा झाली, या बैठकीस आरोग्य सेविका, मेंबर ऑफ होम मिनिस्टरी ऍडओकेट अमर मुल्ला बळीराजा शेतकरी संघटना साजिद मुल्ला, उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारने २७- ८- २०२१ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत पंधरा वर्षांपासून काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता कामावर कमी करण्याचा आदेश राज्य सरकारने घेऊन आरोग्य सेविकांवर अन्याय केला. एका हातात कोरोना योध्द्याचं सर्टिफिकेट आणि दुसऱ्या हातात आरोग्य सेविकांना कमी करण्याचा आदेश त्यामुळे आरोग्य सेविकांना महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात देशोधडीला लावले कोरोना काळात या आरोग्य सेविकांनी स्वताच्या कुटूंबाची काळजी न करता कोरोना पेशंटची सेवा केली. त्याचं फळ म्हणून महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना कमी करून आरोग्य सेविकांवर अन्याय केला. त्यामुळे आरोग्य सेविकांना आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहणार नाही.
या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांनी मेंबर ऑफ होम मिनिस्टरी ऍडओकेट अमर मुल्ला यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली यावर अमर मुल्ला यांनी महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेविकांना कमी करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचे सांगितले. या असंविधानीक आदेशाविरुद्ध मा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या आरोग्य सेविकांना जाहीर पाठिंबा देण्यात आला हा निर्णय तात्काळ मागे नाही घेतला तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले या वेळी शितल शिंदे तब्बसूम मुल्ला मंगल मुळीक सविता रुपनर रुक्मिणी साळुंखे आदी महिला उपस्थित होत्या.