पाटण : महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला घासून गुजरातकडे गेलेल्या चक्रीवादळाने सातारा जिल्ह्यातही आपला वरवंटा फिरवला आहे. वादळवाऱ्यासह जिल्ह्यात काही अपवाद वगळता सर्वदूर दमदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. पाटण तालुक्यात सुद्धा वादळाने धमाकुळ घातला आहे. वादळ व पावसाने महावितरणच्या यंत्रणेसह खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे.शनिवारपासूनच जिल्ह्याला चक्रीवादळाची चाहुल लागली होती. त्यामुळे जिल्हाभर पावसाळी वातावरण तयार झाले असून काल दिवसभर व रात्रभर जिल्ह्यात सर्वदूर सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. वादळाने पाटण शहरासह तालुक्यातील बऱ्याच गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळाने झाडे उन्मळून पडण्याच्या, झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात झाल्या असून त्यात वीजवाहक तारा तुटून, खांब पडून महावितरणचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झाला. पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. त्यामुळे लोकांचे हाल झाले.पावसामुळे पाटण मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे . त्यातच लाईट नसल्याने पाटण ला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नसलेने पाटण शहरात पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नगरपंचायत पाटण ने महावितरण कार्यालयास वीज नसलेने होणाऱ्या पाणी पुरवठा अडचणी बाबत निवेदन नगराध्यक्ष अजय कवडे व उपनगराध्यक्ष विजय ( बापू ) टोळे.पाणी पुरवठा सभापती व नगरसेवक यांनी दिले असून लवकरात लवकर यावर उपाय करावा असे मा. महावितरणचे अधिकारी कांबळे यांना सांगण्यात आले आहे.
गेले पंधरा दिवस पाण्याचा प्रॉब्लेम सुरू असताना नगरपंचायत या कमी लवकरात लवकर यावर उपाय करण्याचा प्रयत्न करीत आहे पण वीज पुरवठा व्यवस्थित होत नसलेने पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नव्हत्या त्यामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचण होत होती त्याबद्दल नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी महावितरण कार्यालयात निवेदन देऊन लवकरात लवकर वीज पुरवठा नियमित करावा म्हणजे पाणी पुरवठा करण्यास अडचण येणार नाही. तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
विजय (बापू) टोळे
पाणी पुरवठा सभापती