महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : वाठार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा याठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती ची सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षातील पहिली शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती . या सभेमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली व या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी विविध योजना व उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे ठरले तसेच या मिटिंग मध्ये वाठार ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच संतोष पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जावेद मुल्ला सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच वाठार ग्रामपंचायतीसाठी नुकतेच रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी श्री रोकडे साहेब यांचे देखील स्वागत व सत्कार शाळेचे उपशिक्षक श्री आनंदा कोळेकर यांनी केले . या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सातारा चे सदस्य श्री गणपतराव हुलवान साहेब वाठार गावच्या सरपंच सौ शोभाताई पाटील माजी उपसरपंच श्री अभिजीत पाटील श्री देवानंद पाटील अध्यक्ष कराड शेतकरी संघटना तसेच तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री अधिकराव भाऊ पाटील हे उपस्थित होते .






















