महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी / सुनील निंबाळकर :
वडगांव निंबाळकर येथे बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचा शाखा उदघाटन महसुल आयुक्त शिवाजीराजे राजेंनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार,ऍड.विजय भालेराव,रविंद्र फुले,कैलास धिवार,ऍड. हेमंत ढोले,अनिल शहा,युवक युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,हेमंत गडकरी सर,संतोष डुबल, नितीन होले,अमोल गायकवाड,सचिन साठे,निलेश मदने,नितीन गायकवाड,सचिन गायकवाड,इ च्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी सुनिल धिवार म्हणाले की या संघटनेत सर्व जाती धर्माचे लोक काम करत आहेत आपण माणुस ही एकजात डोळ्यासमोर ठेऊन फक्त स्त्री आणि पुरुष जाती मानून ही संघटना तुमच्या समोर आणली आहे. असे मत यावेळी यक्त केले.
प्रस्ताविक करताना बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव कैलास धिवार यांनी बहुजन हक्क परिषदेची स्थापना ही चौदा वर्षे पुर्वी करताना हे रोपटे खुप छोटे होते. आज ते वट वृक्ष झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन शाखा अधक्ष्य तानाजी बापू गायकवाड, नंदकुमार मोरे,बाळासाहेब खंडाळे, स्वप्निल जाधव,अशोक मामा गाडे,संजय मोरे,हेमंत देवरकर,लालासो खोमणे इत्यादी शाखेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्यकर्माचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड तर आभार नानासाहेब मदने यांनी मानले.