बारामती ता.१५-: मग ठरलं तर ….शेतकरी कृती समिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात…
सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी...
शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सतीश काकडे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी निंबुत येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला.यावेळी कार्यकर्त्यांनी सतीश काकडे यांचा कारखान्याच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कृती समितीच्या वतीने प्रथम फॉर्म भरण्याचा एकमताने ठराव मंजूर केला.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या त्यामध्ये अजय कदम,शहाजीराव जगताप, आप्पासाहेब गायकवाड, रणसिंग पवार, समीर जाधव, माऊली धुमाळ, किरण साळुंके, शिवाजीराव नाझिरकर, हरिभाऊ तावरे,समीर खलाटे,बाबासाहेब शिंदे, वकील तानाजीराव गायकवाड, अजित माळशिकारे,ऋषिकेश धुमाळ,प्रमोद फडतरे, ज्योतीराम जाधव, राहुल जगताप असे सुमारे ५०० ते ६०० सभासद यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्ष कल्याण भगत होते.
सतीश काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचा मनमानी कारभार सभासदांना विश्वासात न घेणे,कृती समितीच्या मागण्यांना कोणताही प्रतिसाद न देणे अशा प्रकारच्या कारभारामुळे उद्धट वागण्यामुळे व शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहे असे जाहीर केले व शेतकरी कृती समितीच्या वतीने इच्छुक सभासदांना निवडणूक अर्ज भरण्यास सांगितले. असून मी माझी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसंबंधी ची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली होती , तरी इच्छुक सर्व सभासदांनी निवडणूक फॉर्म दिनांक २२/०२/२०२१ पर्यंत भरून त्याची पोचपावती कृती समितीच्या कार्यालयात दाखल करावी असे मार्गदर्शन केले तसेच दिनांक २३/०२/२०२१ रोजी छाननीनंतर कृती समितीच्या वतीने कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावली जाईल व त्यावेळी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असे शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश काकडे यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.