महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
सातारा जिल्हा व फलटण तालुक्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे उग्र स्वरूप धारण केले असून फलटण तालुक्यात अजूनही कोरणा रुग्णांचा आलेख वाढतच असून फलटण तालुक्याची रुग्ण संख्या ही १८ हजारांच्यावर गेली आहे त्यामुळे खाजगी व सरकारी हॉस्पिटल रुग्णांकरता अपुरी पडत आहेत बऱ्याच रुग्णांना बेड भेटत नाहीये यामुळे आता तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये विलगीकरंण कक्ष स्थापन केले जात असून आता सुरवडी येथील ‘रॉयल पॅलेस गार्डन’ याठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन होणार असून हे कार्यालय मोफत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती रॉयल गार्डनचे मालक व सुरवडी गावचे विद्यमान सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील यांनी दिली व तसे पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले असल्याचे सांगितले त्यानुसार आज फलटणचे तहसीलदार समीर यादव व पंचायत
समितीच्या गटविकास अधिकारी सौ गावडे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व येत्या काही दिवसात येथे विलगीकरण कक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले.






















