फलटण : गेली तीस वर्षे फलटण पालिकेची सत्ता एकहाती असून सुद्धा फलटण शहराचा विकास झाला नाही, हे दुर्दैव आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या डेंग्यू व चिकुन गुनियाच्या साथीमुळे सर्वसामान्य माणसांचे आरोग्य व आर्थिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे. फलटण नगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून एक वेळच पुरविल्या जाणार्या पिण्याच्या पाण्यातून आळ्या येत आहेत. स्वच्छतागृह व गटाराची दुरावस्था झाली असून नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची वाट लागली आहे. कोणत्याही मुलभूत सुविधा नगरपालिकेने चांगल्या पद्धतीने देता आल्या नाहीत.मालमत्ता कर दुप्पट करून सुद्धा शहराच्या प्राथमिक सुविधा सत्ताधारार्यांना पुरवता येत नाही. भ्रष्टाचार मात्र पालिकेच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारअसून सत्ताधार्यांना भस्म्या झालाय का काय, असा प्रश्न खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण नगरपालिकेच्या प्रशासनावर टीका करताना विचारला आहे.
फलटण शहरात सुरु असलेल्या साथीच्या रोगाचे थैमान व भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि फलटण नगरपालिकेचा गलथान कारभार याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनवतीने जिंती नाका परिसरातून मोटारसायकलवर शहरभर फेरी काढून फलटण नगरपालिके समोर आंदोलन करण्यात आले.
सध्या फलटणमध्ये सुरु असलेली डेंग्यू व चिकुन गुनिया रोगाची साथ आणि मलनिस्सारण योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरभर सुरू असलेल्या रस्त्याच्या खोदाई उपचारामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था, शहरातील अस्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांची दुरवस्था, प्रशासनाच्या कारभारातील लबाडी, पंतप्रधान आवास योजनेमध्ये अनुदान वाटपातील विलंब, पथदिवे, वाढीव मालमत्ता कर आणि त्यावरील सावकारी दंड व व्याज, संपूर्ण शहरातील घाणीचे साम्राज्य या, अशा अनेक मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने फलटण नगरपालिकेपुढे आंदोलन करण्यात आले.
यावेळी फलटण नगरपालिकेतील गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, युवा मोर्चाचे सुशांत निंबाळकर, नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, नगरसेविका मदलसा कुंभार, नगरसेविका मीना नेवसे, माजी नगरसेवक प्रविण आगवणे, भाजपा तालुकाध्यक्ष उषा राऊत, शहराध्यक्ष विमल कदम, मुक्ती शहा, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना काळात आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी चालवलेल्या लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर कोरोना उपचार केंद्रामध्ये एक रुपयाची मदत न घेता सर्व रुग्णांना औषध उपचारासह सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी सुद्धा याबाबत आरोप केले जात असून यातला एकही आरोप जरी सिद्ध करून दाखवला तर आपण खासदारकीचा राजीनामा देऊ, आरोप करणाऱ्यांनी समोर घेऊन आरोप करावेत. सत्ताधार्यांना पालिकेचा कारभार चालवता येत नसेल, तर त्यांनी खुर्च्याच्या खाली कराव्यात. आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फलटण शहर स्वच्छ व रोगमुक्त करून विकास करून दाखवू असे आवाहन रणजितसिंह यांनी केले.
यावेळी अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, बजरंग गावडे, सचीन अहिवळे अशोकराव भोसले, प्रविण आगवणे, रियाज इनामदार यानी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आपले विचार मांडले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.