राड्यात 2 जण ठार तर 2 जण गंभीर, सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी/ माण : संतोष सुतार
माण तालुक्यातील नरवणे गावातील वाळूच्या साठ्याचा लिलाव तहसीलदार बाई माने यांनी काढला होता.
हा लिलाव मयत चंद्रकांत जाधव यांनी घेतला होता, मात्र त्याच गावातील मयत विलास जाधव व त्यांच्या लोकांनी या लीलावाती वाळू चोरल्याने आज सकाळी हा वाद झाला व दोन गटात जोरदार मारामारी झाली यात आत्तापर्यंत 2 जण ठार झाले असून इतर 2 गंभिर लोकांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या 2 गटामध्ये जमिनीच्या वादावरून 2014 पासून न्यायालयात वाद सुरू असल्याची चर्चा सर्व माण तालुक्यात आहे.