पणन मंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या फंडातून निधी मंजूर
कराड : मौजे खळे, ता पाटण. जि. सातारा येथील जोतिर्लिंग मंदिरालगतच्या सभामंडपाचे काम महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा नामदार बाळासाहेब पाटील यांच्या फंडातून निधी मंजूर झाले आहे. या सभामंडपाचा भूमिपूजन समारंभ सोहळा काल दि. 21 रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील (काका), नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील (तात्या), खळे ग्रामपंचायत सरपंच वैशाली महापुरे (ताई), उपसरपंच वसंतराव पानवळ, रामचंद्र पाटील, संचालक- सह्याद्री सह. साखर कारखाना, कराड बाजार समिती संचालक सुनील पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, शिवाजी पवार (तात्या), गोळेश्वरचे सरपंच चंद्रकांत काशीद, सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष पाटील (बाबा), सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महंमद आवटे, कराड दक्षिण राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटील, प्रमोद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सागर देसाई, कुमार पाटील, मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रवींद्र पानवळ, उपाध्यक्ष भुजंगराव पानवळ यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा संपन्न झाला.
ग्रामस्थ मंडळ खळे व जोतिर्लिंग मंदिर जिर्णोद्धार समिती खळे, ग्रामस्थ गुढेकरवाडी, काजारवाडी, डुबलवाडी, शिद्रुकवाडी, शिबेवाडी यांनी नामदार यांची भेट घेऊन या सभामंडपाच्या जिर्णोद्धार कामी निधीची मागणी केली होती. नामदार यांनी या मागणीची त्वरित दखल घेऊन निधी मंजूर केला व काल दि. 21 रोजी या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
खळे गावचे ग्रामदैवत असलेले श्री जोतिर्लिंग मंदिराचे ६० वर्षांपूर्वी जिर्णीद्धार करण्यात आला होता. खळे व आसपासच्या वाड्यामधील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. काल या मंदिराच्या जिर्णोद्धाराचा भूमीपूजन समारंभ असल्याने सर्व ग्रामस्थ अतिशय आनंदी होते. मंदिर व सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यानंतर गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
यावेळी राहुल कचरे, वाल्मिक कचरे, संजय पानवळ, नितिन पाटील, विशाल कचरे, संभाजी पुजारी, विजय वाघ, मा. सरपंच गजानन पाटील, महादेव पानवळ, संजीव पानवळ, दादासाहेब कचरे, गजानन कचरे, सुरेश गुडेकर, जितेंद्र पानवळ, नामदेव पाटील, अरुण पानवळ, अॅड. उत्तम पानवळ, प्रकाश देसाई, सी. आर. पाटील, रमेश जंगम, धनाजी कचरे, शरद कचरे, रोहित कचरे, संभाजी कचरे, नितिन कचरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.